17 ऑक्टोबर 2024 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)



🔖 प्रश्न.1) भारतीय न्यायालयातील न्यायदेवतेच्या हाती असलेल्या तलवारीच्या जागी काय ठेवण्याचा निर्णय सरन्यायाधीशांनी घेतला आहे ?

 

उत्तर - संविधान

 

🔖 प्रश्न.2) न्यायालयातील न्यायदेवतेच्या हातातील तलवार हटवून त्या जागी संविधान व डोळ्यावरील पट्टी हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय कोणी घेतला आहे ?

 

उत्तर - सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड

 

🔖 प्रश्न.3) छत्रपती संभाजी नगर येथील वैजापूर शहराला कोणता नोंदणी क्रमांक देऊन तेथे नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय उभारण्यास सरकारने मान्यता दिली आहे ?

 

उत्तर - एमएच - 57

 

🔖 प्रश्न.4) उमर अब्दुल्ला यांनी कोणत्या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे ?

 

उत्तर - जम्मू काश्मीर

 

🔖 प्रश्न.5) जम्मू-काश्मीरचे नवीन उपमुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली ?

 

उत्तर - सुरेंद्र चौधरी

 

🔖 प्रश्न.6) 24 वे शांघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन शिखर संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले ?

 

उत्तर - अस्तना

 

🔖 प्रश्न.7) 8 वी इंडिया मोबाईल काँग्रेस 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले ?

 

उत्तर - नवी दिल्ली

 

🔖 प्रश्न 8) चर्चेत असलेले युरोपा क्लिपर हे रोबोटिक सौर ऊर्जा अंतरिक्ष यान कोणत्या देशाचे आहे ?

 

उत्तर - अमेरिका

 

🔖 प्रश्न.9) भारतीय तटरक्षक दलाचे 26 वे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

 

उत्तर - परमेश शिवमणी

 

🔖 प्रश्न.10) NSG चा 40 व स्थापना दिवस कधी साजरा करण्यात आला ?

 

उत्तर - 16 ऑक्टोबर


🪀 करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा 

No comments:

Post a Comment